Mango Leaves For Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांसाठी संजीवनीचे काम करतील आंब्याची पाने, केवळ अशाप्रकारे रोज करा सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mango Leaves For Diabetes | मधुमेहाचा (Diabetes) आजार सध्या वेगाने पसरत आहे. या आजाराने बळी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेही लोकांना सामान्य जीवन जगण्यासाठी त्यांच्या आहारात अनेक बदल (Diabetes Dietary Changes) करावे लागतात, अनेक गोष्टी टाळाव्या लागतात. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patients) असाल तर तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे जे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर (Blood Sugar Level) जास्त परिणाम करत नाहीत (Mango Leaves For Diabetes).

 

मधुमेह असलेल्या रुग्णांना मिठाई खाण्यास मनाई आहे. यामुळेच मधुमेही रुग्ण आंब्यासारखे स्वादिष्ट फळही खाऊ शकत नाहीत. पण, त्यांची पाने नक्कीच वापरू शकतात. मधुमेहींसाठी आंब्याची पाने खूप फायदेशीर ठरू शकतात. आंब्याच्या पानांचा अर्क ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यास मदत करू शकतो (Mango Leaves For Diabetes).

 

आंब्याची पाने कशी उपयुक्त (Benefits of Mango Leaves) ?
मधुमेहाच्या उपचारासाठी आंब्याची पाने खूप उपयुक्त आहेत. त्यात अँथोसायनिडिन (Anthocyanidins) नावाचे टॅनिन असते, जे मधुमेहावर उपचार करण्यास मदत करते. हे डायबेटिक अँजिओपॅथी (Diabetic Angiopathy Treatment) आणि डायबेटिक रेटिनोपॅथीच्या (Diabetic Retinopathy Treatment) उपचारांमध्ये देखील मदत करते. आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, पेक्टिन आणि फायबर (Vitamin C, Pectin And Fiber) असते. याशिवाय आंब्याची पाने मधुमेहाची लक्षणे दूर करण्यासाठी देखील ओळखली जातात.

 

आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिन उत्पादन आणि ग्लुकोज वितरण सुधारण्याची क्षमता असते. ते ब्लड शुगर लेव्हल स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात. आंब्याच्या पानांमध्ये पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर देखील असते.

आंब्याची पाने कशी वापरायची (Uses of Mango Leaves) ?
मधुमेहासाठी आंब्याची पाने वापरण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपी पद्धत अवलंबावी लागेल. तुम्हाला फक्त 10-15 आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि ती पाण्यात व्यवस्थित उकळायची आहेत.

 

पाने व्यवस्थित उकळल्यानंतर, रात्रभर तशीच ठेवा. सकाळी पाणी गाळून ते रिकाम्या पोटी प्या.
काही महिने ते नियमित प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते.

 

प्राचीन चिनी औषधांमध्ये आंब्याच्या पानांचा अर्क मधुमेह आणि दम्याच्या उपचारांमध्ये वापरला जातो.
आंब्याच्या पानांमध्ये फिनोलिक, कॅफीक अ‍ॅसिड, मॅजिफेरिन, गॅलिक अ‍ॅसिड, फ्लेव्होनॉइड्स
(Phenolic, Caffeic Acid, Mangiferin, Gallic Acid, Flavonoids) आणि अनेक अस्थिर संयुगे यांसारखे घटक असतात.
हे सर्व गुणधर्म आंब्याला एक चांगले अँटी-डायबेटिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-एलर्जिक (Anti-diabetic, Anti-oxidant And Anti-allergic)
नैसर्गिक उत्पादन बनवतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Mango Leaves For Diabetes | mango leaves is very effective for diabetes patients know how to use it

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss With Eggs | अंड्यासोबत ‘या’ 3 गोष्टींचे कॉम्बिनेशन वेगाने कमी करते वजन, स्वस्त-सोप्या टिप्स

 

Summer Diet Tips | उन्हाळ्यात आवश्य खा ‘हे’ 4 प्रकारचे मेलन, आरोग्य राहील चांगले !

 

Uric Acid And Ajwain | ‘या’ गोष्टीच्या केवळ एका चमच्याने कंट्रोल होईल वाढलेले यूरिक अ‍ॅसिड, तुम्ही सुद्धा अजमावून पहा