Manika Batra | ऑलिम्पियन मनिका बत्राला उच्च न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’; म्हणाले – ‘खेळाडूंना नाहक त्रास नको’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही खेळाडूला नाहक त्रास देणे थांबवा, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने ऑलिम्पियन मनिका बत्रा (Manika Batra) हिला क्लीन चिट दिली आहे. उच्च न्यायालयाने (High Court) भारतीय टेबल टेनिस महासंघाला (Table Tennis Federation of India) याचे निर्देश दिले आहेत. मनिकाने टीटीएफआयविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. मनिकाने (Manika Batra) खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केलेली नाही. महासंघ नियमबाह्य पद्धतीने निवड करत असून, खेळाडूंना ‘टार्गेट’ केले जात आहे, असे मनिकाने आपल्या तक्रारीत म्हंटले होते.

 

यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्या. रेखा पल्ली (Justice. Rekha Palli) यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला दिले आहेत. ऑलिम्पिक पात्रता सामना गमावण्यासाठी एका प्रशिक्षणार्थीकडून माझ्यावर राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय (National Coach Soumyadeep Roy) यांनी दडपण आणले होते, असा खुलासा मनिकाने यावेळी केला. यावर न्यायालयाने TTFI च्या वकिलांची चांगलीच कानउघडणी केली.

 

 

‘महासंघाच्या कामकाजावर;आम्ही नाखूष आहोत.
कारण नसताना तुम्ही खेळाडूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावता.
कारणे दाखवा नोटीस मागे घेणार आहात की नाही?
चौकशी अहवाल पाहिल्यानंतर खेळाडूंना स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रीत करता यावे,
यासाठी त्यांना त्रास देणे बंद करा. मनिकाने (Manika Batra)
खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केली नसल्याचे तपास अहवालातुन स्पष्ट झाले आहे.
मनिकाला दोष देण्यात काही अर्थ नाही तिला क्लीन चिट देण्यात यावी’, असे न्या. पल्ली यांनी आपल्या आदेशात म्हंटले आहे.

 

Web Title :- diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा