Manoj Jarange Patil | पुण्यातील सभेत जरांगेंची खंत, ”मराठ्यांनी ज्यांना मोठे केले त्यांचाच आरक्षणाला विरोध”

पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची आज पुण्यातील खराडी परिसरात मनोज जरांगेंची सभा सुरू आहे. या सभेत बोलताना जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत असलेल्या राजकीय नेत्यांना (Political Leader) लक्ष केले. आज आरक्षणासाठी मराठा समाज वेदना सहन करत आहे. अनेक नेत्यांना मराठ्यांनी मोठे केले. तेच आता दूर झाले आहेत, अशी खंत जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केली.

खराडीच्या सभेत बोलताना जरांगे म्हणाले, मराठ्यांनी कधीही कुणाचा द्वेष केला नाही. इतरांना आरक्षण मिळताना माझ्या समाजाने त्यात खोडा घातला नाही. मराठा समाज पहिल्यापासून दानशूर होता. अनेकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाने मदत केली. प्रत्येकाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, अशी कायम भूमिका ठेवली. मराठा समाजाने स्वतःचे आरक्षण दुसऱ्यांना देऊ केले. मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. आज मराठ्यांच्या लेकरांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. इतरांना आरक्षण देताना मराठा समाजाने कधीही विरोध केला नाही. आता आमच्या आरक्षणाला विरोध होत आहे.

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही पोटाला चिमटा घेऊन आमची लेकरं शिकवली. आम्ही जी सोसलं ते आमच्या पोरांच्या निशिबी येऊ नये यासाठी प्रयत्न केले. आमची मुले भविष्यात नोकरीला लागल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. पण कित्येकदा चांगले मार्क पडूनही आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत.
जर आरक्षण असते तर ही परिस्थिती आली नसती.

जरांगे पुढे म्हणाले, आता सरकारला सुटी नाही. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे.
आम्ही कुणाचं घेत नाही आणि आमचं आम्ही मिळवणार यात काहीच शंका नाही.
ओबीसींना दिलेले आरक्षण त्यांनी त्यांचे घ्यावे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना