Pune Crime News | शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनीच मारहाण (Beating) केल्याची घटना हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील सोनार आळी येथे शनिवारी (दि.18) रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime News)

सविता तुषार जगताप (वय-37 रा. सोनार आळी, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोपट बाबुराव बंड, वैभव पोपट बंड, विद्या पोपट बंड, मच्छिंद्र पोपट बंड, गोरख बंड, ओमकार काका बंड, अनिता काका बंड, पुनम विठ्ठल बंड, अनिता बाळु बंड, अनिता गोरख बंड यांच्यावर आयपीसी 452, 143, 147, 149, 427, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता जगताप या उरुळी कांचन येथील सोनार आळीत राहतात. शनिवारी रात्री साडेआठ च्या सुमारास त्या पती आणि मुलासबोत घरात होते. त्यावेळी आरोपी बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसले. ‘वडिलोपार्जीत शेत जमीन हिस्सा नंबर 348 मधील आजीचा हिस्सा का विकला’ असं म्हणून सविता जगताप,
त्यांचा मुलगा शिवांश व त्याचे पती तुषार जगताप यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
तसेच ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन पतीच्या हातातील मोबाईल जमिनीवर फेकून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक