Manoj Jarange Patil | भुजबळांचा एकेरी भाषेत उल्लेख करत जरांगेंचा सरकारला इशारा, ”तुम्ही त्याचं ऐकून, दबावाखाली…”

जळगाव : Manoj Jarange Patil | आम्हाला शांतता ठेवायची आहे. सरकारलाही विनंती करतो की बोलल्याप्रमाणे सगळे गुन्हे मागे घ्या, कार्यकर्त्यांची अटक थांबवा. जे दोषी आहेत त्यांचं समर्थन नाही. पण निष्पाप लोकांना गुंतवलं जात आहे ते थांबलं पाहिजे. एकट्या छगन भुजबळचं (Chhagan Bhujbal) ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे परीणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते जळगाव येथील सभेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही त्याच्याच (छगन भुजबळ) गळ्यात हात टाकून हिंडा मराठ्याच्या दारातही उभे राहू नका. २४ डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही तातडीने लेखी देऊन २४ तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. त्याच्या (छगन भुजबळ) सुरात सूर मिसळू नका. तुम्ही त्याचं ऐकून, दबावाखाली येऊन अन्याय केला तर ५५ टक्के मराठे आहेत हे विसरु नका.

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले, मायबाप बांधवांना विनंती आहे. ज्यांना आरक्षण मिळालं आहे आणि
ज्यांना मिळालं नाही असे सगळेजण एकत्र या. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची हीच वेळ आहे. सगळ्यांनी एकत्र या.
माझा जीव गेला तरीही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही.

जरांगे म्हणाले, मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात. मग आरक्षण घेणारच. आम्ही सरसकट आरक्षणच घेणार.
आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करु नका.
नोंदी सापडूनही आरक्षण दिलं नाहीत तर गाठ आमच्याशी आहे हा तुम्हाला जाहीर इशारा आहे.

जरांगे म्हणाले, मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत.
आम्ही जात पाहिली नाही. तरीही काहीजण आपला अपप्रचार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आलं होतं कुणाला
अटक होणार नाही आणि गुन्हे मागे घेतले जातील. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना माझा सवाल आहे
की अजून गुन्हे मागे का घेतले नाही? आमचे लोक का अटक केले? शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना