Nitesh Rane | ससून ड्रग्ज प्रकरणी नितेश राणेंचा गंभीर आरोप, ”ड्रग्ज माफियाचा सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर”

कणकवली : Nitesh Rane | ससून ड्रग्ज प्रकरणात (Sassoon Hospital Drugs Case) सत्ताधारी पक्षातील मंत्र्याचे नाव आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याने सुद्धा ससूनमधून कोणी-कोणी पळून जाण्यास भाग पाडले त्यांची नावे सांगणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाचे धाबे दणाणले आहे. आता सत्ताधारी पक्षाने या प्रकरणावरून विरोधकांवर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. भाजपा (BJP)आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरापे केला आहे. ते कणकवलीत पत्रकारांशी बोलत होते.

नितेश राणे यांनी म्हटले की, ललित पाटील जेव्हा तोंड उघडेल तेव्हा ठाकरे सेनेचे अनेक नेते जेलमध्ये असतील. त्यामुळे नाशिकमध्ये मोर्चा काढण्यापेक्षा एक मोर्चा मातोश्रीवर काढा. कारण ड्रग्ज माफियाचा सर्वात जवळचा मोठा मित्र मातोश्रीवर आहे. मतांच्या राजकारणासाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करत आहेत. त्यांची पंतप्रधानावर बोलण्याची पात्रता नाही.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी इस्त्राईलच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. १९९३ च्या दंगलीच्या काळात दहशदवादी काय करु शकतात, हे शरद पवार (Sharad Pawar) यांना माहीत असताना फक्त मतांसाठी राजकारण करणे योग्य नाही. देशाची आणि जगाची सुरक्षा महत्वाची आहे.

हमासने हल्ला केला त्याचा निषेध करताना आम्ही ठाकरे, पवारांना कधी पाहिले नाही. याचाच अर्थ जिहादी आणि धर्मांध दहशतवाद्यांना त्यांचे समर्थन आहे. अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना ते पाठिंबा देत आहेत. उद्या ओवेसीच्या रॅलीत उद्धव ठाकरे खांद्याला खांदा लावून सहभागी झाले तर आश्चर्य वाटणार नाही. एवढे हे मतांसाठी स्वतःचे विचार विसरलेले आहेत.

नितेश राणे म्हणाले, माँ साहेबांनी बोललेला नवस उद्धव ठाकरेंनी पूर्ण केला नाही. तर एकनाथ शिंदेनी पूर्ण केला.
याबाबत राऊत यांनी बोलावे. आरोप झाल्यावर राजीनामा द्यायचा तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा
राजीनामा का घेतला नाही? आमच्या मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार ठाकरे सेनेच्या नेत्यांना नाही.

नितेश राणे म्हणाले, निष्ठावंत काँग्रेसवाल्यांनी राहुल गांधींच्या आदेश प्रमाणे विजेचे बटन सुरू करू नये.
जो विजेचे बटन ऑन करेल तो काँग्रेसचा नेता, कार्यकर्ता नाही. वीज सुरू केल्यामुळे अदाणीला पैसे जाणार असतील
तर काँग्रेसवाल्यांनी विजेचा वापर करू नये. त्यांनी राहुल गांधींच्या आदेशाचे पालन करावे.
ठाकरे शिवसेना कार्यकारिणीमध्ये आता निष्ठावाण उरलेले नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लेखक राजन खान यांच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Pune News | पुणे रेल्वे स्थानकात ‘फेस रेकग्निशन सिस्टिम’चे १२० सीसी टीव्ही कॅमेरे, आरोपी ओळखून देणार माहिती, जाणून घ्या…