… तर थाळयाच वाजवत बसावं लागेल : अनुराग कश्यप

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाचे थैमान वेगाने परसत आहे. विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत चार हजारांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना देखील करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचे काही खरे नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे.

देशवासीयांना कोरोना विषाणूपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी आपले डॉक्टर्स, परिचारिका आणि सर्व आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. ही सर्व माणसे तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. कारण त्यांच्यावरच आपले भवितव्य अवलंबून आहे. जर त्यांना काही झाले तर, कितीही थाळ्या वाजवा किंवा दिवे पेटवा, तरी आपले काही खरे नाही. अशा आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

कश्यप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजात घडणार्‍या विविध घडामोडींवर तो नेहमीच आपली मते बिनधास्तपणे मांडताना दिसतात. देशभरात सध्या कोरोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like