चोरट्या पावलाने ‘मॉन्सून’ पुण्यात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेले काही दिवस पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात आगेकुच करणाऱ्या मॉन्सूनने आज आपली नजर पुण्याकडे वळविली असून पहाटेपासून पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत असून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेकडे १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पुण्यात आज पडणारा पाऊस हा मॉन्सूनचा असून काही वेळानंतर मॉन्सूनचे आगमन पुण्यात झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जाणार आहे. दरवर्षी धुमधडाक्यात येऊन शहरातील रस्त्यांचे ओढे करणारा मॉन्सून यंदा मात्र, अतिशय चोरट्या पावलाने शहरात दाखल झाला आहे.

मॉन्सूनने रविवारी अहमदनगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल मारली होती. कोकणानंतर गेल्या दोन दिवसात राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, पुणे, मुंबई पट्ट्यात अजूनही पावसाला म्हणावी तशी सुरुवात झाली नव्हती. रविवारी मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. ५८ तालुक्यात पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातही अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

दुष्काळचे चटके सहन करत असलेल्या मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. जगप्रसिद्ध वेरुळच्या लेणी परिसरातील खळाळलेला सीता न्हाणी धबधबा पुन्हा प्रवाहीत झाला आहे.

सातारा, सांगली परिसरात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पुणे सातारा महामार्गावर काही ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.

पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून येत आहेत. मात्र, दरवेळी मॉन्सूनचे जसे धमुधडाक्यात आगमन होते, तसे यंदा न होता़ तो अतिशय शांतपणे चोरट्या पावलाने शहरात दाखल झाला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

रोमान्सचा मूड वाढविण्यासाठी अवश्य खावेत ‘हे’ १० सुपरफूड

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय

Loading...
You might also like