महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्याला आंध्रप्रदेशातून केली अटक्

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचीचा सदस्य असलेल्या आणि गडचिरोलीत माओवादी चळवळीचा प्रभारी किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी अशा दोघांना पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.

किरण कुमार उर्फ किरण दादा आणि त्याची पत्नी नर्मदा या दोघांना महाराष्ट्र पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.

किरण कुमार हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी (डिकेएसझेडसी) चा सदस्य आहे. तो गडचिरोलीत सक्रीय माओवादी चळवळीचा प्रभारी आहे. दोघेही छत्तीसगडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यावर २० लाखांचे बक्षिस होते.

किरण हा मुळचा विजयवाडा येथील आहे. तो राज्य समितीचा सदस्य आहे. प्रभात मासिकाचे कामही तो पाहतो. माओवादाचा एक अंग असलेल्या डीकेएसझेडसी च्या प्रचार विभाग, माध्यम आणि शिक्षण यांचे देखील काम तो पाहायचा. तर त्याची पत्नी नर्मदा गेल्या २२ वर्षांपासून भूमिगत होती. गडचिरोलीत झालेल्या स्फोटात कुमारचा हात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com)

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

 झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

 रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

 

Loading...
You might also like