मराठा क्रांती मोर्चा धडकणार थेट शरद पवारांच्या निवासस्थानी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात मराठा समाज आंदोलनाचा प्रश्न चीघळला आहे. असे असताना मराठा समाजाने आता थेट शरद पवार यांना टार्गेट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जेष्ठ नेते शरद पवार एकीकडे पाठिंबा जाहीर करतात, तसेच आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात दयावे असेही म्हणतात तसेच घटना दुरुस्तीला देखील मदत करू अशा दुटप्पी भूमिका मांडल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्मण झाला आहे. त्यामुळे बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शरद पवार यांच्या शारदानगर येथील निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B074G3TJYF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’61eb8aff-9a14-11e8-9988-5137f253f3c3′]

मराठा समाजाने आता बारामतीत थेट पवार यांच्या घरापुढेच ठिय्या आंदोलनाचा एल्गार केला असून खरे काय ते बोलण्याविषयी आवाहन करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.९) सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन होणार असून यामध्ये तालुक्‍यातील मराठा समाजातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील युवक आणि समाज बांधव सहभागी होणार आहेत.
[amazon_link asins=’B07D9G4PMX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de8c41e8-9a13-11e8-9f7e-b59051df39a9′]
राज्यात आषाढी एकादशीपासून मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पेटल्यानंतर राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शरद पवार यांनी आरक्षणासाठी घटनादुरूस्तीचा उपाय सुचविला होता. मात्र, त्यांचा हा उपाय खोडून काढीत तीन महिन्यांत आरक्षणाचा प्रश्‍न निकाली काढला जाईल, असे सांगून नारायण राणे यांनी पवार यांचे म्हणणे खोडून काढले; त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा पवार यांच्याकरिता राजकीय प्रतिष्ठेचा विषय झाला होता. यातूनच पवार यांच्याकडून आर्थिक निकषांवर आरक्षणाबाबतही वक्तव्य केले गेले. यामुळे चर्चेला उधाण येवून आरक्षणाबाबत पवार यांची नेमकी भूमिका काय? असे सवाल केले जावू लागले. याच काळात सरकार आरक्षणासाठी सकारात्मक असताना शरद पवार हे आरक्षणाआड दुटप्पी राजकारण करीत असून त्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. राजकीय घडमोडींच्या याच पार्श्‍वभूमीवर आता मराठा आंदोलक बारामती येथे शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणार असून पवार यांना सवाल करणार आहेत. आंदोलकांना पवार आता काय उत्तर देणार, यावर आगामी राजकीय गणितं ठरणार असल्याने अन्य पक्षांचेही या बारामतीतील आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.