मराठा आरक्षण: बीड येथे आणखी एकाची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षण प्रश्न अधिकच चिघळला आहे. आज बीड मंगळवारी (ता. ३१) येथे राज्यातील सातवा बळी गेला.अभिजित बाळासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2db49d33-9486-11e8-824a-edf764e4d917′]

याबबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अभिजीत देशमुख ने विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले होते. पण त्याला नोकरी लागत नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबावर बँकेचे कर्जदेखील थकीत होते. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी तर नाहीच शिवाय व्यवसाय करण्याकरिता बँकेचे कर्जही मिळत नाही असे तो आपल्या मित्रांशी नेहमी बोलत होता.

या सर्व परिस्थितीत त्याला सध्या मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या विविध आंदोलनात त्याने देखील सक्रिय सहभाग नोंदवला होता. यानंतर आता “मी देखील या लढाईतील शिपाई असून बलिदान देणार” असल्याचे त्याने सोमवारी रात्रीही बोलून दाखविले होते असे डॉ. धनराज पवार यांनी सांगितले. अभिजित ने मंगळवारी सकाळी घराजवळील एका  झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . त्याच्या खिशात एक चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण ,बँकेचे कर्ज आणि औषधाचे खर्च या कारणामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. केज पोलीस ठाण्याचे जमादार ढाकणे यांनी पंचनामा केला असून त्यातही असाच उल्लेख करण्यात आला आहे.