Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या घडामोडींना वेग, सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे-फडणवीसांची बैठक, जरांगेंची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई : Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अंतिम इशारा देत मुंबईत धडकणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत. आज पार्श्वभूमीवर मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dvendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण उपसमितीसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. (Maratha Reservation)

विशेष म्हणजे सह्याद्री अतिथीगृहातील या बैठकीसाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सरकार मनोज जरांगे यांना कोणते आश्वासन देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maratha Reservation)

दरम्यान, या बैठकीपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत मनोज जरांगे म्हणाले, मला त्यांचे आधी ऐकायचे आहे.
त्यांची नेमकी बैठक कशासाठी आहे, त्यांचे नेमके काय चालले आहे. ते पाहिल्यावर भूमिका मांडेन. मराठवाड्यात सर्व कुणबी आहेत, मराठे नाहीत. त्याचे सर्व पुरावे सरकारला आम्ही दिले. ओबीसींच्या ८३ क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच असल्याचे म्हटले आहे. तत्सम म्हणून मराठ्यांची जात आहे.

ते पुढे म्हणाले, मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर तिथल्या हैदराबादच्या मराठ्यांना आताही आरक्षण आहे,
याचे पुरावे आम्ही तिथून जाऊन आणले आहेत. आम्ही इथपर्यंत पुरावे दिले आहेत. आता तर नोंदी सापडल्या आहेत.
त्यामुळे त्यांच्याकडे मोठा पुरावा आहे.

जरांगे म्हणाले, सरकारच्या गॅझेटमध्ये सगळे कुणबी आहेत, असेच दाखवले आहे. तशी आकडेवारीच आहे.
कोणत्या तालुक्यात किती मराठा, कुणबी होते याची आकडेवारी दिली आहे. याचे पुरावे आम्ही सरकारला दिलेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फर्स्टच्या रात्री टोळक्याचा कर्वेनगर भागात राडा, दोन जणांना बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (Video)

आंबेगाव येथील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेची कारवाई

अडीच वर्षापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून, खडकी परिसरातील घटना; दोन अल्पवयीन मुले ताब्यात

Nashik Crime News | एक वर्षापूर्वी सिमेन्स कंपनीत झालेल्या चोरीचा नाशिक पोलिसांकडून छडा, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त