Maratha Reservation Protest | मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज वरुन राजकारण तापले, संभाजीराजे छत्रपतींचा गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले -‘तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा… ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Protest | जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवालीमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police Lathi Charge) करत हवेत गोळीबार (Firing) केला. गावकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याने लाठीचार्ज झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या मुद्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. तर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे खुलासा मागितला आहे. (Maratha Reservation Protest)

काय म्हणाले संभाजीराजे?

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल.

मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी गृहमंत्र्यांना दिला आहे.

शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

जालन्यातील उपोषण आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबवावं असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण?

29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह इतर दहा जण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला (Maratha Reservation Protest) बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या
आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला.
त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केला तर आंदोलकांकडून
पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचे बोललं जात आहे. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत
आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार करुन लाठीचार्ज केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”

PM Narendra Modi | मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार का? यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा त्यांचा अधिकार…”