Maratha Reservation | १ डिसेंबरपासून साखळी उपोषण, पण शांततेत करा, नेत्यांच्या फराळ कार्यक्रमाला जाऊ नका : जरांगेंचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : येत्या तीन-चार दिवसात मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा महाराष्ट्र दौरा (Maharashtra Tour) सुरू होणार आहे. त्यानंतर १ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण करण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. परंतु हे उपोषण शांततेत करा, दिवाळी फराळाच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका असेही आवाहन जरांगे यांनी केले आहे. (Maratha Reservation)

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने जीवंत राहून लढले पाहिजे. गोरगरिब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढा. कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा, साखळी उपोषण ताकदीने उभे राहिले पाहिजे. आपआपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने १ डिसेंबरला साखळी उपोषण करायचे आहे. तसेच जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर त्यांनी मराठा समाजासाठी काय केले हे विचारा.

मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही आजपासून मराठा समाजाच्या पाठिमागे उभे रहा, असं नेत्यांना सांगा. तुम्ही पक्षाला, नेत्याला मोठं करण्यासाठी आपल्या पोरांच वाटोळ करु नका. नेत्यांच्या फराळाला जाऊच नका. आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, त्यांच्यातील नेत्यांच्या विरोधात आहोत, समाजाच्या विरोधात नाही. (Maratha Reservation)

जरांगे म्हणाले, धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न
लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ आरक्षणाच्या कार्यवाहीचा
लेखी बॉण्ड देण्यासाठी येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ
आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर वेगळा विचार करावा लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Amitabh Bachchan Instagram Post – अमिताभ बच्चनने इंन्टाग्रामवर शेअर केली नातू अगस्त्यसाठी एक खास पोस्ट…

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची हटेना नजर..

Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…

Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..

Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…