Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मधुमेह ही समस्या आजकाल अनेक लोकांना भेडसावते (Winter Food For Diabetic Patients). कित्येक लोकांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. मधुमेह हा आजार असाध्य आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रचंड लक्ष द्यावे लागते. तर या सवयींकडे लक्ष दिल्यास मधुमेहाला आटोक्यात आणलं जाऊ शकतं. हिवाळ्यामध्ये तापमानात बदल होतो (Winter Food For Diabetic Patients). त्यामुळे पचनाची क्रियाही मंदावाली जाते. मात्र जर तुम्हालाही मधुमेहाचा त्रास असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून त्रास कमी करू शकता (Winter Food).

१) बाजरी (Bajra)-

हिवाळ्यात बाजरीपासून बनवलेल्या भाकरीचा किंवा पदार्थांचा आहारात समावेश करा. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर मधुमेहाच्या पेशंटसाठी फायदेशीर असते. बाजरीचा आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही बाजरीपासून भाकरी, लाडू आणि खिचडी बनवून खाऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी रोज बाजरीचे सेवन केल्यास, त्यातून तुम्हाला भरपूर प्रथिने मिळतील (Health).

२) दालचिनी (Cinnamon)-

दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुम्ही याचे खाऊ शकतात.
याशिवाय दालचिनीमुळे हृदयाशी संबंधित असलेल्या आजारांचा धोकाही कमी होतो. आपण चहामध्ये दालचिनीचा वापर
करू शकतो.

३) आवळा (Amla) –

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. आवळ्यात क्रोमियम भरपूर प्रमाणात असते.
आवळ्यात व्हिटॅमिन सी समृद्ध प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे मधुमेह असलेल्या पेशंटला याचा फायदा होतो.

४) गाजर (Carrot)-

गाजर निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्ही दररोज गाजराच खावे. गाजराचा रस करून तुम्ही पिऊ शकता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Drug Case | ‘ससून’चे डिन डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते
तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी; देवकाते यांचे निलंबन

येरवडा कारागृहातील ‘नन्हे कदम’ बालवाडीच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन

राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? मनोज जरांगेंचा वडेट्टीवार यांना संतप्त सवाल