Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama Online) – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीच्या मुद्यावर केंद्र सरकारने (Central Government) याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) याचिकांवर पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्पष्ट केलं आहे.

एसीबीसीचे (SEBC) नवे प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही या मतावर खंडपीठ ठाम आहे. याच मुद्यावरुन सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आता केंद्र सराकारने (Central Government) दाखल केलेली पुनर्विचार याचिका (Reconsideration petition) फेटाळली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने (state government) कायदा (Act) करावा आणि मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मार्ग सोडवावा अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) वतीने जी रिव्ह्यू पीटीशन (Review Petition) दाखल करण्यात आली होती.
ती सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अमान्य केली आहे.
याचाच अर्थ असा की, न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे (Central Government) आहेत.
केंद्र सरकारने यासंदर्भात आता कायदा करवा किंवा राज्य सरकारने कायदा करावा.
केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र बसून यावर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली.

Web Titel :- maratha reservation sc reject the central government reconsideration of reservation

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल