मराठा क्रांती मोर्चाचा विद्रोह ; मराठवाड्यात इंटरनेट बंद 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चा दरम्यान  एका आंदोलकाने गोदावरी नदी पात्रात उडी मारून जीव दिला, याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या आंदोलकांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. याचेच पडसाद मराठवाड्यात पाहायला मिळाले, महाराष्ट्र बंदच्या या घोषणेनंतर मराठवाड्यात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. याच बरोबर अफवा पसरू नयेत म्हणून मराठवाड्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाने आरक्षण आणि अनेक मुद्द्यांमुळे पुन्हा एकदा आंदोलन केले आहे. याच आंदोलनाला बरेच ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सोलापूरमध्ये तर आंदोलकांनी १६ बस फोडल्या आहेत. इतकेच नव्हे तर परभणीत एका पोलीस व्हॅनसह पाच बस जाळण्यात आले. त्यातच काकासाहेब शिंदे या आंदोलक तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने सरकारचा निषेध म्हणून औरंगाबादमधील गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याने वातावरण तापले असून मराठा क्रांती मोर्चाने आज बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच राज्यभर या बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. औरंगाबादमध्ये बंदमुळे सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. उस्मानाबादमध्येही आंदोलकांनी धरणे आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे उस्मानाबाद मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ff21114-8f0d-11e8-9e5c-cbe1bd56a51c’]

औरंगाबादमधील गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीत उडी मारून जीव दिला. यामुळे आंदोलक जास्त प्रमाणात पेटले असून त्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा दिली . महाराष्ट्र बंदच्या या घोषणे नंतर मराठवाड्यात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. याच बरोबर अफवा पसरू नयेत म्हणून मराठवाड्यात इंटरनेट बंद करण्यात आले आहे.