अ‍ॅक्ट्रेस अश्विनी भावेकडून मराठी नाटक समूहाला 20 लाखांची मदत, 4 महिन्यांसाठी 200 रंगभूमी कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या देशात गेल्या दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आहेत लॉकडाऊन सुरू आहे. सर्व काही ठप्प असल्यानं अनेक कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागत आहे. अनेकजण जमेल तशी इतरांना मदत करत आहेत. बॉलिवूड कलाकारांनीही अनेक कर्मचाऱ्यांचा खर्च उलचला आहे. पीएम केअर्सलाही दान दिलं आहे. अशात मराठीतही काही मराठी रंगभूमी कर्मचारी आहेत ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्वांच्या मदतीसाठी आता अभिनेत्री अश्विनी भावे पुढे आली आहे.

नाटक समूह आणि रंगभूमी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बामती आहे. कारण आता अभिनेत्री अश्विनी भावेनं त्यांना मदतीचा हात दिला आहे. अभिनेत्री अश्विवी भावेनं 200 रंगभूमी कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोबतच मराठी नाटक समूहाला त्यांनी 20 लाखांची मदत केली आहे. यात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे ऋषीकेश जोशी आदी मंडळी आहेत. दरमहा 5 लाख असे 4 महिन्यांकरिता 20 अश्विनी भावे यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

रंगभूमी कर्मचारी आणि नाटक समूहासाठी नक्कीच ही दिलास देणारी बातमी आहे. कारण सध्या सर्व काही ठप्प असल्यानं अनेक रंगभूमी कर्मचारी अडचणीत आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like