पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरट्यांचा ‘डल्ला’ !

नांदेड : पोलीसानामा ऑनलाईन – सध्या दिवसेंदिवस समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. अनेकदा सामान्य लोकांच्या घरी चोऱ्यामाऱ्या होतात. मात्र आता हे चोरटे एवढे बिनधास्त झाले आहेत की आता तर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाच्या घरावर डल्ला मारला आहे. त्यामुळे चोरट्यांमध्ये पोलीसांचीही भिती राहीलीच नाही की काय असे वाटत आहे.

सेवानिवृत्त झालेले पोलीस निरीक्षक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी तीस हजाराचा ऐवज पळवला. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास सप्तगिरी कॉलनीत ही घटना घडली. एका पोलीस अधिकाऱ्याच्याच घरात चोरी झाल्याने परिसरात भितीचे आणि खळबळीचे वातावरण आहे.

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक प्रकाश टाकळीकर हे सप्तगीरी कॉलनीत राहतात. ते आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. ता. ११ जूलैच्या रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील गोदरेजचे कपाट फोडून २९ हजार ३०० रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले. बाहेरगावहून परत आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे टाकळीकर यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्याच्याच घराच चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळळ उडाली आहे. तसंच या प्रकारामुळे चोरट्यांमध्ये पोलीसांची भिती नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाग्यनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत फस्के यांनीही भेट दिली. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या