खळबळजनक ! पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील महिलेच्या ताब्यातून तब्बल 118 किलो गांजा जप्‍त, दोघे फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड मार्गावर असणाऱ्या कुरकुंभ ता. दौंड येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा जवानांनी एका कारमध्ये बेकादेशीरपणे वाहतूक करण्यात येत असलेला ११८ किलो गांजा पकडत गांजा वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी
घटनास्थळावरून दोन आरोपी फरार झाले असून एका महिलेला कुरकुंभ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Marijuana
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त करत असताना पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा जवान मुख्य सुरक्षा रक्षक प्रल्हाद रोटे, सुरक्षा रक्षक अभिजित सरगर व परमेश्वर राठोड यांना कुरकुंभ हद्दीतील एका पेट्रोल पंपानजीक पहाटे साडेपाचच्या सुमारास एक कार उभी असल्याचे दिसले. त्यांनी याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांची चौकशी सुरू केली असताना पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी कारची डिक्की उघडण्यास सांगितले. त्यावेळी कार मधील सर्वांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. दोन पुरुष अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यास यशस्वी झाले. पण त्यांच्या सोबत असणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले.

यावेळी सदर कारची तपासणी केली असता कारच्या मागील बाजूस असलेल्या डिकीमध्ये गोन्यांमध्ये गांजा भरून त्याची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले असून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार पंडित मांजरे, के. बी. शिंदे, अमोल राऊत, राकेश फाळके, सचिन बोराडे, दिलीप भाकरे, असिफ शेख, अमोल देवकाते, सुरज गुंजाळ, पोलीस मित्र अभिजित शितोळे या पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त