लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव ; विवाहितेची आत्महत्या, सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – लठ्ठ असल्यामुळे घटस्फोटासाठी दबाव टाकत शारिरीक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे नुकतीच घडली.

प्रियंका पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ पुष्कराज नंदकुमार प्रभुणे (३२, रा. आदिनाथनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर केदार श्रीकांत पेटकर (३५), सुरेखा श्रीकांत पेटकर (५५), श्रीकांत विश्वनाथ पेटकर (६०), सर्व रा. बुरूड गल्ल, फलटण), जगदीश माडीवाला (४०, रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेराहून पैसे आणावेत यासाठी आणि ती लठ्ठ असल्यामुळे तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून प्रियंकाने २५ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास भोसरी पोलीस करत आहेत.