बारामती : विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह 5 जणांवर FIR दाखल

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – सांगवी (ता. बारामती) येथील विवाहितेच्या आत्महत्ये (suicide) प्रकरणी सासरच्या 5 जणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अवघ्या वर्षभरात मृत्यूला कवटाळणाऱ्या विवाहितेच्या आत्महत्येमुळे सांगवी परिसरात गेले दोन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. बारामती तालुका पोलिसांनी परिस्थिती हाताळली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

गितांजली अभिषेक तावरे (वय 21 रा. सांगवी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नणंद सचिता सचिन काळभोर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली), वर्षा वाबळे (रा. पुणे), सासू शारदा वसंत तावरे, पती अभिषेक वसंत तावरे व सासरे वसंत केशवराव तावरे (रा. सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; पोलीस निरीक्षकासह 4 जणांवर CID कडून FIR

BCCI ची घोषणा ! IPL 2021 च्या राहिलेल्या मॅच UAE मध्ये होणार, जाणून घ्या सविस्तर

बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीतांजली आणि अभिषेक यांचा विवाह वर्षभरापूर्वी म्हणजेच 24 मे 2020 रोजी झाला होता. त्यावेळी लॉकडाऊन असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सांगवीत हा विवाह पार पडला. विवाहापूर्वी झालेल्या बोलणीनुसार 7 तोळे सोने 1 लाख हुंडा आणि दीड लाखांचे गृहउपयोगी साहित्य दिले होते. त्यानंतर विवाह झाल्या दिवसापासूनच मृत गितांजली हिला पती अभिषेक, नणंद सचिता, सासू शारदा आदीनी माहेरहून 40 ते 50 सोने आणावे या मागणीसाठी तगादा लावत तिचा शारिरीक अन् मानसिक छळ सुरु होता.

तसेच गेल्या वर्षभरापासून गिंतांजलीला मोबाईलवर बोलू न देणे, सणाला माहेरी न पाठवणे असे प्रकार सुरु होते. 24 मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी माहेरकडील मंडळींनी गितांजलीला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. त्यावेळी तिने कसल्या शुभेच्छा देता. आज माझा मरण दिवस आहे, नणंदा आणि पतीने मला मारहाण केल्याचे फोनवर रडत सांगितले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी गितांजलीने औषध प्राशन केल्याचा निरोप सास-यांनी तिच्या माहेरी दिला. माहेरकडील मंडळींनी तातडीने बारामतीला धाव घेतली. तिथून तिला पुण्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारादरम्यान तिचा 27 मे रोजी मृत्यू झाला. दि.28 मे रोजी माहेरकडील संतप्त मंडळींनी सासरच्या दारातच तिचे अंत्यसंस्कार केले.

Also Read This : 

PM Jan-Dhan Account : तुमचे जन धन खाते आहे ? मग घ्या 1.3 लाखांचा लाभ, जाणून घ्या

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

‘आमदार मोहिते राजकारणातील ‘ब्लॅकमेकर्स’, त्यांना त्यांच्या पक्षातही किंमत नाही’; माजी खा. आढळराव पाटलांचा ‘हल्लाबोल’

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन