काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Masked Aadhaar Card | आता सुरक्षेच्या दृष्टीने मास्क्ड आधार कार्ड (Masked Aadhaar Card) आले आहे. मास्क्ड आधार कार्डमध्ये सुरू वातीचे 8 नंबर लपवलेले असतात. या नंबरवर क्रॉसची निशाणी xxxx-xxxx असते. इतर चार 4 नंबर दिसतात. यामुळे अनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड गेले तरी त्याचा चुकीचा वापर होत नाही.

मास्क्ड आधार कार्ड घरबसल्या असे ऑनलाइन डाऊनलोड करा…

– UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर जा.

– वेबसाइटवर ‘आधार डाऊनलोड करा’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार/व्हीआयडी/नामांकन आयडीचे ऑपशन निवडा.

– Masked आधारच्या ऑपशनवर टिक करा.

– येथे काही महत्वाची माहिती नोंदवावी लागेल.

– माहिती नोंदवल्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

– रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

– हा ओटीपी नोंदवा.

– येथे काही आणखी माहिती नोंदवावी लागेल.

– ही माहिती नोंदवल्यानंतर ‘आधार डाऊनलोड करा’ वर क्लिक करा.

– Masked आधार डाऊनलोड करू शकता.

पासवर्डने उघडेल आधार कार्ड

आता कोणतेही खासगी कागदपत्र उघडण्यासाठी पासवर्ड टाकावा लागतो, विशेषता बँकेसंबंधीत कागदपत्रांमध्ये. अशाच प्रकारचा पासवर्ड डाऊनलोड झालेल्या आधार कार्डसाठी वापरावा लागेल. पासवर्ड काय आहे हे डाऊनलोड फाईलमध्ये नोंदलेले असते. हा पासवर्ड तुमच्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्माचे वर्ष असते.

Web Title : Masked Aadhaar Card | what is masked aadhaar card uidai aadhaar card download

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | ‘या’ ग्रीन एनर्जी शेयरने भरली गुंतवणुकदारांची झोळी, एका वर्षात दिला 42 पट रिटर्न

Gold Price Today | विजयादशमीनिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची झुबंड; 400 कोटींचा टप्पा पार

Nitesh Rane | दसरा मेळाव्यानंतर नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले – ‘उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात’