भिवंडीतील ब्रश कंपनीत भीषण आग

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – भिवंडीतील काल्हेर येथे असलेल्या ब्रश कंपनीला भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी व ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत पाच गोदामं जळून खाक झाली आहेत.

काल्हेर येथील जय भवानी कम्पाऊंडमध्ये ब्रश कंपनी आहे. या कंपनीत पहाटे पावणेसहाच्या सुमारास आग लागली. दरम्यान ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. धुराचे प्रचंड मोठे लोळ बाहेर पडत होते. याची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परंतु आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन केंद्रातून बंब आणि पाण्याचे टॅंकर मागविण्यात आले आहेत. येथील पाच गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. दरम्यान या आगीत लाखोंची वित्तहानी झालेली आहे. अद्याप तरी कोणी जखमी किंवा मृत असल्याची माहिती समोर आलेली नाही. याआधीही येथील एका कापडाच्या कंपनीत आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like