Video : मॉरिशसमध्ये ‘पर्यावरणीय’ आणीबाणी जाहीर !, असं काय घडलं ? जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन, पोर्ट लुईस, दि. 10 ऑगस्ट : स्वच्छ पाणी आणि निळ्याभोर समुद्रासाठी मॉरिशस जगात प्रसिध्द आहे. मात्र, याच मॉरिशमध्ये आता ‘पर्यावरणीय आणीबाणी’जाहीर करावी लागलीय. कारण देखील तसंच आहे. या मॉरिशसच्या समुद्रात मोठा अपघात झालाय. त्यामुळे तेलाचे टँकर फुटल्याने तेल समुद्राच्या पाण्यावर पसले आहे. यामुळे समुद्राचे पाणी काळे झाले आहे.

मात्र, या मॉरिशसच्या समुद्र किनार्‍यांची भयावह स्थिती जपानी तेल टँकर जहाजामुळे झालीय. हे जहाज 25 जुलैपासून मॉरिशसच्या दक्षिणपूर्व किनार्‍यावर अडकले असून यातून हजारो टन कच्चे तेल बाहेर पडत आहे. आतापर्यंत अंदाजानुसार या टँकरमधून सुमारे 1000 टन तेल समुद्रात वाहून गेले आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी काळे झाले आहे. म्हणूनच मॉरिशसमध्ये ’पर्यावरणीय आणीबाणी’ जाहीर केलीय.

याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे. एमव्ही वकाशिव्हो नावाचा हे तेल टँकर 25 जुलैपासून अडकले आहेत. तेल गळतीमुळे मॉरिशसचा निळाभोर समुद्र आता काळा झालाय. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी पर्यावरणीय आपत्कालीन स्थितीची घोषणा केलीय.या अपघातामुळे देशासाठी धोका निर्माण झालाय.

प्रविंद जगन्नाथ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेतलीय. याबाबत पर्यावरण संरक्षणाचे काम करणारे ग्रीनपीस म्हणाले की, यामुळे मॉरिशसमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पर्यावरण संकट निर्माण होणार आहे. यामुळे सागरी जीव तसेच पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सॅटेलाईट छायाचित्रात समुद्रावर तेल पसरताना दिसत आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन याबाबत म्हणाले, त्यांचा देश मॉरिशसच्या मदतीसाठी विशेष पथके आणि उपकरणे पाठवित आहे. कारण, मॉरिशसजवळ फ्रान्समधील रियुनियन बेट आहे.

सध्या हजारो स्थानिक लोक तेल साफ करण्यासाठी मदत करताहेत, असे डेली मेलने वृत्ता म्हटले आहे. रविवारी प्रिन्सटन बीच आणि आजूबाजूच्या परिसरातील समुद्रकिनारा साफसफाईसाठी हजारो सामान्य लोक सामील झालेत. दुसरीकडे जपानने म्हटले आहे की, टँकरमधून होणारी गळती थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मात्र, टँकरला वाचविणे अशक्य आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. तर, पीएम जगन्नाथ म्हणाले, टँकर पूर्णपणे पाण्यात बुडाल्यास परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. तसेच समुद्र किनार्‍यावर तेल अधिक प्रमाणात गोळा होणार आहे.