‘या’ कारणामुळे रायबरेली आणि अमेठीची जागा काँग्रेसला सोडली

लखनऊ : वृत्तसंस्था – आम्‍ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि आरएसएसवादी शक्‍तींना दुर्बल करण्‍यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारासंघातील अमेठी व रायबरेली या जागा काँग्रेसला दिल्‍या आहेत असं स्पष्टीकरण बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल आहे.

अमेठी व रायबरेली या जागांविषयी बोलताना मायावती म्हणाल्या की, ‘आम्‍ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि आरएसएसवादी शक्‍तींना दुर्बल करण्‍यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारासंघातील अमेठी व रायबरेली या जागा काँग्रेसला दिल्‍या आहेत. या दोन्‍ही जांगावरुन दोन सर्वोच्‍च नेत्‍यांनी पुन्हा निवडणूक लढवावी. त्यांना केवळ याच मतदार संघात अडकून पडावे लागू नये. तसेच काँग्रेसच्‍या या दोन्‍ही उमेदवारांना महाआघाडीचे मते मिळतील.’

उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक
लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या १४ लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडी झालेली आहे. त्यांनी आघाडीत काँग्रेसला सामील करून घेतले नसले तरी या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला

लोकसभेसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाजवादी पार्टी ३८ तर समाजवादी पार्टी ३७ जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काँग्रेसाठी अमेठी आणि रायबरेली या सोडल्या आहेत. तर मथुरा, बागपत आणि मुझफ्फरनगरच्या जागा राष्ट्रीय लोकदल पक्षाला देण्यात आल्या आहेत. काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या होत्या.