राज्यात सत्तेत एकत्र असले तरी, ‘या’ जागेवर काँग्रेस-शिवसेना ‘आमने-सामने’

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेत सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेत वाटा मिळाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठवेत महाविकास आघाडीने नवा संसार थाटला आहे. विधानसभेत एकत्र असलेले हे दोन पक्ष भिवंडी महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आमने-सामने आले आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत फुट पडल्याचे पहायला मिळतेय.

निजामपूर शहर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले. तर कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील यांनी त्यांच्या पत्नी माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करुन या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली आहे.

प्रतिभा पाटील यांच्यासोबत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांचा मोठा गट आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी महापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण सात तर उपमहापौर पदासाठी सात जणांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी शहर महानगरपालिकेत शिवसेना, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये काँग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 9, समजावादी पार्टीचे 2 असे नगरसेवक आहेत.

Visit : Policenama.com