Mayor Muralidhar Mohol | पुणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘पुण्यदशम’ने प्रवासादरम्यान ‘आधारकार्ड’ची सक्ती रद्द !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mayor Muralidhar Mohol | पुण्यदशम बसने प्रवास करताना आधारकार्ड मागू नये, असे आदेश एपीमपीएमएल प्रशासनाला देण्यात येतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी आज सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.

पुणे महापलिकेने (Pune Corporation) पीएमपीएमएलच्या (PMPML) सहकार्याने मध्यवर्ती शहरात 10 रुपयांत दिवसभर प्रवास ही योजना सुरू केली आहे. ‘पुण्यदशम’ नावाने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेसाठी 50 एसी मिनी बसेस खरेदी केल्या आहेत. मध्यवर्ती शहरात पाच किमी पेरिफेरी मध्ये 10 रुपयांमध्ये दिवसभर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. मात्र हा प्रवास करताना आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधारकार्ड नंबर दिल्यासच तिकीट दिले जाते अन्यथा बस मधून उतरवण्यात येते.

दरम्यान आज सर्वसाधारण सभेत (PMC General Body Meeting) पीएमपीएमएल विषयक एक प्रस्ताव चर्चेला आला असताना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी प्रवासादरम्यान ‘आधारकार्ड’चे (Aadhaar Card) बंधन काढून टाकावे अशी मागणी केली.
नागरिकांना सुविधा देताना बंधने का लादताय ? असा प्रश्न उपस्थित केला.
यावर सुरवातीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) आणि नंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol)
यांनी यासंदर्भात पीएमपीएमल प्रशासनासोबत चर्चा झाली आहे. आधारकार्ड चे बंधन काढून टाकावे याबाबत त्यांना आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले.

Web Titel :- Mayor Muralidhar Mohol | Good news for Punekars! Now ‘Punyadasham’ cancels ‘Aadhaar card’ during travel!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘त्या’वेळी चंद्रकांत पाटील यांनाही तोंडाला फेस आला होता – संजय राऊत

Nitesh Rane | शिवसेना-राणे पुन्हा आमनेसामने; ‘त्या’ 2 प्रकल्पावरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर ‘प्रहार’

Anant Gite | ‘शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत’ – शिवसेना नेते अनंत गिते