Mayor Murlidhar Mohol | पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या 8 दिवसांत, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव (pune ganesh utsav) मंडळाच्या गणपतीची मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज पुलावरुन (Chhatrapati Sambhaji Maharaj Bridge) जाते. पुलावरून जाणाऱ्या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाब चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता. महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. यानंतर मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची बैठक घेतली जाईल असे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी सांगितले होते.

त्यानुसार महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंची बाबतच्या विषयाबाबत येत्या 8 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली. या बैठकिला उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Wadekar), महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित (Brijesh Dixit), सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), काँग्रेस (Congress) गट नते आबा बागुल (Aba Bagul), गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लवकरच तोडगा काढण्यात यश येईल

मेट्रोच्या कामाबाबत निर्णय झालेल्या मुद्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मध्यम मार्ग काढण्याचा निर्णय


पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title :- Mayor Murlidhar Mohol | Mayor Murlidhar Mohol informed about the decision to stop the work of Pune Metro in the next 8 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या 17 सिटर मिनीबसला लागलेल्या आगीत बस जळून खाक

Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

Maharashtra Police | पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार