‘मेधा पाटकर या परकीय एजंट’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मेधा पाटकरांना परकीय आर्थिक मदत मिळत आहे. इतकेच नाही तर त्या जोरावरच परकीय शक्तींकडून देशाची विकासकामे रोखण्यात येत आहेत असा खळबळजणक आरोप कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपालांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मेधा पाटकर ही एकटीच महिला एवढ्या ताकदीने लोकांना गोळा करते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही महिला कशी विरोध करू शकते, यावर संशय आला होता. यामुळे त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून चौकशी सुरु आहे.” असेही पुरुषोत्तम रुपालांनी म्हटले. इतकेच नाही तर, ‘नर्मदा आंदोलनासाठी पाटकरांना परदेशातून पैसे येतात. त्यांच्या सारख्या विरोधकांना देशाची विकास कामे थांबविण्यासाठी ही मदत दिली जाते. या परदेशी ताकदींची नावे नसतात, असेही त्यांनी सांगितले.

मेधा पाटकर यांच्याविषयी थोडक्यात
मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.

त्यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए. पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.

मेधा पाटकर यांना मिळालेले पुरस्कार

-मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
-राइट लाइव्हलिहुड ॲवॉर्ड, स्वीडन – १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्या सोबत संयुक्तपणे )
-दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
-महात्मा फुले पुरस्कार
-मानवी हक्क रक्षक पुरस्कार – ॲम्नेस्टी इंटरनॅशनल
-यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथील जैताई देवस्थानतर्फे जैताई मातृगौरव पुरस्कार (२७-९-२०१७)