मेगाभरती की मृगजळ…..??? 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

सुप्रिया थाेरात

मेगाभरती होणार ….. ह्या घोषणेमुळे  सरकारी नोकरीच्या जाहिरातींकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या  मनात आशा पल्लवित झाल्या होत्या. कारण सरकारी नोकरीसाठी अनेक दिवस अभ्यास करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी होती.

नोकरी नाही म्हणून आलेले नैराश्य, बेरोजगारी, आर्थिक विवंचना, रखडलेली लग्ने यातून अनेक तरुणांना मेगाभरती हा आशेचा किरण वाटला होता. तब्बल आठ वर्षांनंतर राज्य सरकारने नोकरभरतीची घोषणा केली होती. मेगाभरतीनुसार राज्यात ७२,००० पदे भरली जाणार होती. ज्यात यंदा ३६००० आणि पुढच्या वर्षी ३६००० पदे भरण्यात येतील असं सांगण्यात आलं होत. पण मेगाभरती स्थगित करण्यात आली  हे जाहीर करण्यात आलं त्यामुळं आता मेगाभरतीवर कधी होणार यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार असून, तोपर्यंत सरकारी मेगाभरतीला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑगस्ट रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी व आकाशवाणीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना केली. आणि ही  भरती पुढे ढकलण्यात आली.  मुख्यमंत्र्यानी  सांगितल्यानुसार, हा मुद्दा मागासवर्गीय आयोगकडे पाठविण्यात आला आहे. आयोगाचा निकाल नोव्हेंबर अखेर पर्यंत येऊ शकतो. तूर्तास मेगाभरती रद्द झाली किंवा पुढे किती कालावधीसाठी पुढे ढकलली यावर अंदाज लावता येणं अवघड आहे.  कदाचित  १० ते २० डिसेंबरच्या दरम्यान किंवा जानेवारीमध्ये  मेगाभरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. पण याबद्दल अद्यापही कोणतीही ठोस माहिती किंवा निर्णय नाही.

 [amazon_link asins=’B01K4K6266,B07DC5QRHN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’441aa88d-a612-11e8-a3dc-eb0b26f032b0′]
मेगाभरतीमुळं निर्माण झालेले प्रश्न 
१ ) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार राज्यात तब्ब्ल १ लाख ८० हजार पद रिक्त असताना ७६००० जागांसाठीच का भरती ?
२ ) मेगाभरतीची  कोणत्याही अधिकृत वेबसाइडवर जाहिरात का नाही , फक्त घोषणाच का?
२ ) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच भरती का, यापूर्वी जाहिरात का नाही  ?
४) आरक्षण ,मेगाभरती आणि राजकारण यांचा काही संबंध आहे का ?
३ ) मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुकीमुळे अचारसंहिता लागू झाली तर भरती अनिश्चित काळासाठी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली  जाणार का ?
४) मेगाभरती होईपर्यंत वय उलटून जाणारांचं काय ?
मेगाभरतीला स्थगिती मिळाल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात भीती ,नैराश्य व संभ्रम निर्माण  झाल्याचं चित्र दिसून येतंय . तसेच या विषयावर खाजगी क्लास चालकांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की  कोणत्याही अधिकृत वेबसाइड वर यापूर्वी मेगाभरतीची जाहिरात देण्यात आली नव्हती ती फक्त घोषणाच होती. यापुढे मेगाभरती कधी होणार यावर काही सांगणं आत्ताच शक्य नाही. विद्यार्थ्यांनी मनात गोंधळ व संभ्रम न ठेवता जोमाने अभ्यास चालू ठेवावा. म्हणजेच तूर्तास  तरी ४ ते ६ महिने वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर मेगाभरतीची ही प्रक्रिया अधिक लांबणीवर पडता काम नये. त्यावर राज्य सरकारची ठोस निर्णय  व भूमिका हवी अन्यथा  मेगाभरतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मेगाभरती मृगजळच ठरेल !