Mental Health | मानसिक स्वास्थ्य जपा ! ‘या’ 3 गोष्टींपासून अंतर ठेवा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mental Health | सध्या मानसिक आरोग्याची समस्या (Mental Health Problem) हा मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषत: कोरोना महामारीपासून (Corona Epidemic) लोकांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांचे निदान होत आहे. कोरोना महामारीचा दुष्परिणाम म्हणून लोकांमध्ये तणाव-चिंता आणि नैराश्याच्या (Stress-Anxiety And Depression) घटना खूप जास्त नोंदवल्या जात आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) विशेष दक्ष राहिले पाहिजे. जर तुमचं मन निरोगी राहिलं, तरच शरीराचं आरोग्य चांगलं राहील. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

 

जीवनशैली (Lifestyle) आणि आहारातील बिघाडामुळे (Dietary Changes) आजार तर येतातच. मात्र, मानसिक आजाराचा आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होताना दिसतो. कमी वयात लोकांमध्ये चिंता, नैराश्य यासारख्या समस्या वाढत आहेत, त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे (Mental Health). कळत-नकळत आपल्या अनेक वाईट सवयी आपल्याला मनोविकाराकडे (Psychosis) घेऊन जात असतात.

 

झोपेची कमतरता धोकादायक (Lack Of Sleep Is Dangerous) –
मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बहुतेकांचे कारण झोपेची समस्या असते. निद्रानाश किंवा झोप न येण्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक क्षमतेवर होत असतो. पुरेशी झोप घेतल्याने तुमचे शरीर आणि मन रिलॅक्स होते. त्याचबरोबर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे मूड, एनर्जी लेव्हल, मोटिव्हेशन आणि मानसिक आरोग्य (Mood, Energy Level, Motivation) या समस्या जाणवू शकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही त्यांना नैराश्य आणि चिंताग्रस्त विकार होण्याची शक्यता जास्त असते.

 

सोशल डिस्टन्सिंगमुळे ताण वाढला (Social Distance Increases Stress) –
सोशल डिस्टन्सिंगमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. कारण बराच काळ घरात बंद राहिल्यामुळे आणि सुसंवाद राहिला नाही. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी ताजी हवा, लोकांना भेटणे अत्यंत आवश्यक आहे. घरात राहण्याच्या सवयीमुळे नैराश्याची लक्षणे वाढू शकतात. घरातून सुरक्षितपणे बाहेर पडल्यामुळे तुमचे नैराश्य दूर होते. तसेच यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.

आहाराचा मानसिक आरोग्यावर परिणाम (Effects Of Diet On Mental Health) –
जंक फूड्स (Junk Food) आणि अस्वास्थ्यकर आहाराचा (Unhealthy Diet) थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जंक फूडच्या वाढत्या सेवनामुळे लठ्ठपणा (Obesity) आणि मधुमेहाचा (Diabetes) धोका वाढतो. अधिक साखर, चरबी किंवा अत्यधिक प्रक्रिया केलेले पदार्थ (More Sugar, Fat or Highly Processed Food) चिंता-तणाव वाढवतात. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आहारात फायबर, जीवनसत्त्वे आणि संपूर्ण धान्ययुक्त पदार्थांचा (Fiber, Vitamins, Whole Grains) समावेश करा.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Mental Health | how to keep mental health good what not to do for better mental health

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Position To Sleep | झोपण्याची योग्य पद्धत ठरते आरोग्यासाठी फायदेशीर, पाठीचे दुखणे आणि घोरणे होते कमी; जाणून घ्या

 

Benefits Of Nuts | ‘या’ कारणांसाठी आहारात सुकामेव्याचा समावेश अवश्य करावा; जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव घसरले, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट भाव