‘मेरा पीएम चोर है’ सोशल मिडियावर टोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस समर्थकांकडून ‘मेरा पीएम चोर है’ ही मोहीम सोशल मिडियावरुन सुरु केली असून भाजप समर्थकही त्याला विरोध करताना दिसत आहे. भाजप समर्थकांनी ‘राहुल गांधी का पुरा खानदान चोर है’ अशी हॅश टॅग सुरु केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a9a0579-bef1-11e8-9513-7d6c8d02300c’]

फ्रान्सचे माजी अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणाले. त्यामुळे आता तरी मोदींनी मौन सोडावे आणि देशाला सत्य सांगावे अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केले. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर पलटवार केला. राहुल गांधी यांचं घराणेच भ्रष्टाचाराची जननी असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली. या आरोप प्रत्यारोपानंतर काँग्रेस समर्थकांकडून ट्विटरवर ‘मेरा पीएम चोर है’ ही हॅग टॅग चालविला जाऊ लागला.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8acd0e4d-bef1-11e8-83fc-2dd42b79adce’]

त्यात एकाने ‘दिवार’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची आठवण करुन देणारा फोटो टाकला आहे. त्यात त्याने अमिताभ प्रमाणे आपल्या हातावर मेरा पीएम चोर है असे लिहिले आहे. या ट्विटरवर काही जणांनी असे म्हणण्याची हिंमत कशी होतेय असा सवाल उपस्थित केला आहे. काही जणांनी टी शर्ट वर ‘मेरा पी एम चोर है’ आणि ‘देश का चौकीदार चोर है’ असे रंगवून ते घातलेले फोटो टाकले आहेत.

नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला : विखे

याला भाजप समर्थकांनी उत्तर देण्यास सुरुवात केली असून राहुल गांधी का खानदान चोर है अशी मोहिम सुरु केली आहे. त्यात त्यांनी अगदी १९४८ च्या जीप घोटाळ्यापासून अगदी होते नव्हत्या त्या सर्व गोष्टींची आठवण करुन देण्यात आली आहे. त्या काँग्रेस समर्थकांनीही मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून मोदी सरकारच्या काळात पळालेल्या मोदी, मल्ल्या, चौक्सी यांची जोड दिली आहे. हे सोशल मिडियावरील वॉर सध्या जोरात सुरु आहे.