कफ आणि सर्दीनं परेशान आहात ?, आवर्जून खा मेथीचे लाडू ! जाणून घ्या इतर महत्त्वाचे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना पावसाळ्यानंतर वाताचा किंवा कफाचा त्रास होतो. अशात उष्ण गुणात्मक, शरीरात व त्वचेच्या ठिकाणी स्निग्धता निर्माण करणारे तसंच कफनाशक व वातनाशक पदार्थ पोटात गेलेले चांगले असतात. हे गुणधर्म देणारे पदार्थ या दिवसात लाडू किंवा चिक्कीसारखया पदार्थांमध्ये वापरता येतात. थंडीत आवर्जून लाडू केले जातात. अनेकजण मेथीचे लाडू करतात. आज आपण याचे फायदे जाणून घेणार आहोत.

– कणिक, साखर, तूप, सुकामेवा या पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू तयार केले जातात. मेथी कडू रसाची असल्यानं जंतुघ्न म्हणून उपयोगी पडते.

– यात डायसोजेनिन नावाचं महत्त्वाचं तत्व असतं. त्यामुळं यात सूजनाशक आणि जंतूनाशक असेही दोन्ही गुणधर्म असतात.

– सांध्याची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळं येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीनं छातीत कफ जमा होणं, सर्दी होणं, हात-पाय-कंबर आखडणं अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते.

– थंडीमध्ये केसात होणारा कोंडा दूर करण्यासाठी मेथीचा उपयोग करता येतो.

– मेथीत अ आणि क जीवनसत्व, लोह, कॅल्शियम असतं. त्यामुळं थंडीत मेथी उत्तम टॉनिक म्हणून काम करते.

– रक्त वाढवणं, रक्तशुद्ध करणं, हाडांना बळकटी देणं, त्वचा आणि डोळ्यांची काळजी घेणं हे फायदे मेथीच्या सेवनानं मिळतात.

– तुम्हीही हिवाळ्यात मेथीचे लाडू आवर्जून खा. याशिवाय तुम्ही नेहमीच्या स्वयंपाकातही मेथीचा वापर करू शकता.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.