#MeToo : प्रियंका चोपडाने लैंगिक शोषणाबाबत केला पहिल्यांदाच मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री प्रियंका चोपडा अनेकदा चर्चेत असते. पुन्हा एकदा आता प्रियंकाने मोठा खुलासा केला आहे आणि त्यानंतर ती आता चर्चेत आली आहे. खरेतर मीटू या मोहिमेनुसार प्रियंकाने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. प्रियंकानेदेखील या प्रसंगाचा सामना केला आहे.

परंतु याची वाच्यता करताना प्रियंका चोपडा भारतात नाही तर न्यूयॉर्क मध्ये होती. प्रियंका 10 व्या वार्षिक महिला संमेलनात सहभागी झाली होती. तिने तिचा अनुभव सांगताना सांगतिले की, तिलाही लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले आहे. परंतु त्या काळात कोणी ऐकून घेत नव्हते आणि कोणी दखलही घेत नव्हते.

मीटू मोहिमेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा खरा चेहरा समोर आला. अनेकांचा पर्दाफाश झाला. अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप झाल्याचे दिसून आले. प्रियंकालादेखील याबाबत प्रश्न विचारला होता की तिला कधी लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आहे का? त्यावेळी तिने सांगितले होते की, होय मीदेखील लैंगिक शोषणाची शिकार झाले आहे.

प्रियंका चोपडाने बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही देखील स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. सध्या ती स्काय इज पिंक मुळे खूपच चर्चेत आहे.