Shivsena | ‘शिवसेना फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत होते’; केंद्रीय राज्यमंत्र्याचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ‘नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटल नव्हतं’, असं सांगताना रामदास कदम भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी त्यांनी ‘शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव साधला, शिवसेना (Shivsena) पक्ष फोडला’ असे म्हणत टीकास्त्र सोडलं. यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर भाष्य केलं आहे.

 

शिवसेना (Shivsena) फोडणारे शरद पवार नसून संजय राऊत (Sanjay Raut) होते, असा गंभीर आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांना राष्ट्रवादीसोबत (NCP) जायचं असल्याने त्यांनी भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) तोडली असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झालं नसतं आणि भाजप शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं, असं आठवले यांनी म्हटले. आठवले यांनी संजय राऊत यांच्यावर पक्षात फूट पडल्याचा आरोप केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 

रामदास कदम यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीका केली. शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना फोडली. अजित पवार यांना प्रशासकीय कामांचा प्रचंड अनुभव आहे. त्याच जोरावर अजित पवार यांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. तर शरद पवार यांनीही संधी साधून अनेकदा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना पक्षातील काही लोक व त्यांचे बंडखोर आमदार यांच्यात काही झाले की आलेच मा. शरद पवार साहेबांना मध्ये घ्यायला.
बाबांनो तुमचे काम, तुमचे वाद स्वत:च्या हिंमतीवर करा.
कशाला तुमचे खापर मा. शरदजी पवार साहेबांवर फोडता.
#सत्तापिपासू मुळे वाण नाही पण गुण लागला वाटतं तुम्हला,
असं ट्विट करुन रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil- Thombare) यांनी हल्लाबोल केला आहे.

 

Web Title :- Shivsena | union minister ramdas athwale comment on
sanjay raut sharad pawar uddhav thackeray ramdas kadam shivsena bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा