Mhada Exams Paper Leak Case | ‘म्हाडा’च्या परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या GA Software Technologies Pvt Ltd कंपनीच्या संचालकासह तिघांना अटक, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून अनेक गोष्टींचा ‘पर्दाफाश’; काही कोचिंग क्लासेस ‘रडार’वर (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mhada Exams Paper Leak Case | आरोग्य विभागाचा (Maharashtra Health Department) पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) ‘म्हाडा’च्या पूर्व परीक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर (Mhada Exams Paper Leak Case) कारवाई केली आहे. सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यामध्ये ज्या कंपनीमार्फत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार होती त्या GA Software Technologies Pvt Ltd. कंपनीच्या संचालकाचा समावेश आहे. आरोपींना आज (रविवार) शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court) हजर करण्यात आले असता त्यांना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

डॉ. प्रितिश दिलीपराव देशमुख Dr. Pritish Diliprao Deshmukh (वय- 32 रा. महिंद्रा अॅन्थीया, खराळवाडी, पिंपरी-चिंचवड-Pimpri-Chinchwad पुणे), संतोष लक्ष्मण हरकळ Santosh Laxman Harkal (वय-42 रा. मिलिनियम पार्क, एमआयडीसी, चिखलठाणा, औरंगाबाद -Aurangabad) आणि अंकुश रामभाऊ हरकळ Ankush Rambhau Harkal (वय- 44 रा. किनगांवराजा, ता. सिंदखेडराजा बुलढाणा Buldhana) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सायबर पोलीस आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पदांच्या परीक्षांच्या पेपर फुटीचा तपास करत असताना रविवारी (दि. 12) होणाऱ्या ‘म्हाडा’च्या परीक्षेचे पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना (Pune Police) मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथके तयार करुन औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), बीड (Beed), मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) येथून संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु करण्यात आली.

 

 

दरम्यान, औरंगाबाद येथील संशयितांसोबत संपर्क साधून त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी परीक्षेच्या पूर्वी पेपर फोडून देण्याची योजना टार्गेट करिअर पॉईंट (the target career point aurangabad) या संस्थेचा संचालक अजय चव्हाण (Director Ajay Chavan) आणि सक्षम अकॅडमीचे (saksham academy aurangabad) संचालक कृष्णा जाधव (Director Krishna Jadhav) आणि इतरांनी आखल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच सध्या पुण्यात राहणारे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांनी ‘म्हाडा’च्या परीक्षेला बसलेल्या परिक्षार्थींना पेपर (Mhada Exams Paper Leak Case) देण्याची तयारी दर्शवल्याचे पोलिसांना समजले.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टार्गेट करिअर पॉईंट संस्थेचा संचालक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव आणि त्यांचा साथिदार अंकित चनखोरे (Ankit Chankhore) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ‘म्हाडा’च्या परीक्षासाठी बसणाऱ्या तीन परिक्षार्थींचे प्रवेश पत्र, त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, कोरे धनादेश, आरोग्य विभागाच्या ‘क’ वर्गासाठी बसलेल्या 16 आणि ‘ड’ वर्गासाठी बसलेल्या 35 परीक्षार्थींच्या नावाची यादी आणि प्रवेश पत्रांच्या प्रति मिळाल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

 

 

तर पुणे आणि ठाणे येथील पथकांनी संशयित संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्यावर पाळत ठेवून त्यांना क्रेटा (एमएच 20 ई एल 7111) या गाडीतून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रितीश देशमुख हा देखील होता. प्रितीश देशमुख हा G.A. Software या कंपनीचा संचालक असून या कंपनीमार्फत ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार होत्या. प्रितीश याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या लॅपटॉपमध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेचे पेपर (MHADA Written Exam Paper) तसेच लिफाफ्यामध्ये पेन ड्राईव्ह आढळून आला. त्यामध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेचे पेपरसेट होते.

 

संशयित संतोष आणि अंकुश हरकळ यांची झडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्ये ‘म्हाडा’च्या लेखी परीक्षेसंदर्भात संशयास्पद संभाषण आणि परीक्षार्थींचे प्रवेश पत्र तसेच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या संदर्भातील याद्या आढळून आल्या. या सर्वांवर सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber police station) गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke),
सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले (ACP Vijaykumar Palsule) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे (Police Inspector Kumar Ghadge),
पोलीस निरीक्षक मीनल पाटील (Police Inspector Meenal Patil) आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ (PSI Anil Dafal) यांनी केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Police Inspector Ankush Chintaman) करीत आहेत.

 

संशयित आरोपी डॉ. प्रितीश देशमुख (Dr.Pritish D.Deshmukh) याच्या वतीने अ‍ॅड. विजय ठोंबरे (Adv. Vijay Thombre)
यांनी कामकाज पाहिले तर अंकुश आणि संतोष हरकळ यांच्या वतीने अ‍ॅड. ऋषीकेश सुभेदार (Adv. Rishikesh Subhedar),
अ‍ॅड. प्रसाद निकम आणि अ‍ॅड. तन्मय देव (Adv. Tanmay Deo) यांनी कामकाज पाहिले.

 

कोचिंग क्लासेस पोलिसांच्या ‘रडार’वर

पुणे पोलिसांनी आतापर्यंत लष्कर भरती परीक्षा, आरोग्य विभागाची परीक्षा आणि
आता म्हाडा परीक्षा संदर्भात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
आरोग्य विभाग आणि म्हाडा परीक्षा संदर्भातील काही दुवे जुळले असल्याचं देखील समोर आलं आहे.
आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आता पोलिस त्यांच्याकडे सखोल तपास करणार
असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान, प्रकरणाचा तपास करताना अनेक कोचिंग क्लासेस (coaching classes) पोलिसांच्या रडारवर असल्याचं देखील समोर आलं आहे.
काही कोचिंग क्लासेसकडे (coaching classes in aurangabad)
सखोल चौकशी देखील करण्यात येणार असल्याचं समजतंय.

 

Web Title :- Mhada Exams Paper Leak Case | Three arrested, including director Dr.Pritish D.Deshmukh of GA Software Technologies Pvt Ltd., exposed by police commissioner Amitabh Gupta; Some coaching classes on radar (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा