“तु धोनी आहेस म्हणून कसाही वागू शकत नाही”

कोणत्या खेळाडूने केली अशी टीका वाचा सविस्तर

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएलमध्ये सध्या चर्चेतील विषय म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा झालेला सामना आहे. या सामन्यात पंचांनी नो बॉल दिला नाही म्हणून कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने थेट मैदानात येऊन पंचाशी वाद घातला. त्याच्या यावर्तणूकीवर बऱ्याच खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या खेळाडूंमध्ये इंग्लडचा माजी कर्णधार मायकेल वॉर्न याने धोनीवर टीका केली आहे.

तो धोनी असेल आणि त्याच्या देशात तो काहीही करु शकत असेलही. मात्र, एका कर्णधाराने डगआऊटमधून उठन मैदानात येऊन खेळपट्टीवरील पंचांच्या दिशेने बोट करणे हे योग्य नाही. एक कर्णधार म्हणून तुम्ही असे उदाहरण नाही देऊ शकत, अशी टीका वार्न यांने केली आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना चांगलाच रंगला होता. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची गरज होती. बेन स्टोक्सने टाकलेला चेंडू नोबॉल असूनही मैदानावरील पंचांनी तो दिला नाही. तर त्यातील एक पंचांनी हा नोबॉलचा इशारा दिला होता. त्यावर मैदानावरील दोन पंचामध्ये यावर सावळागोंधळ सुरु होता. त्यामुळे धोनी नियमांचे उल्लंघन करत पुन्हा मैदानात गेला आणि पंचांशी वाद घातला. त्यावर त्याच्या या वर्तणूकीची आयपीएल ने दखल घेत त्यावर कारवाई केली. सामन्याच्या मानधनाचे ५० टक्के मानधन कापले आहे.