Microsoft बंद करणार जगभरातील आपले सर्व रिटेल स्टोर्स, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टेक्नोलॉजीच्या जगतातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक मोठी घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, ती लवकरच जगभरातील आपले सर्व रिटेल स्टोर्स बंद करत आहे. हे बंद केल्यानंतर कंपनीचे रिटेल टीम मेंबर्स कस्टमर्स सर्व्हिस, सेल्स, ट्रेनिंग आणि सपोर्ट सारख्या सर्व्हिसशी जोडलेले राहतील. मात्र, कंपनीने ही माहिती दिलेली नाही की, हे रिटेल स्टोर्स केव्हापासून बंद होतील. मायक्रोसॉफ्टने अखेर रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे जाणून घेवूयात.

मायक्रोसॉफ्टने आपल्या न्यूजरूमवर सर्व रिटेल स्टोर्स बंद करण्याची घोषणा करताना माहिती दिली आहे की, आता डिजिटल स्टोर्सवर फोकस करण्यात येईल. कंपनीचे म्हणणे आहे की, केवळ तेच चार स्टोर्स खुले ठेवले जातील ज्यामध्ये आता प्रॉडक्ट्सचा सेल होत नाही आणि त्यांचा उपयोग केवळ एक्सप्रियन्स सेंटर म्हणून केला जातो. सोबतच कंपनीचे म्हणणे आहे की, ते मायक्रोसॉफ्ट डॉट कॉमवर आपल्या डिजिटल स्टोरफ्रंटमध्ये गुंतवणूक सुरू ठेवणार आहे.

सोबतच कंपनी एक्सबॉक्स आणि विन्डोजमध्ये जारी राहील. कंपनी अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्या 190 बाजारांमध्ये प्रत्येक महिन्याला 1.2 बिलियनपेक्षा जास्त आहे. कंपनी लंडन, एनवायसी, सिडनी आणि रेडमंड कॅम्पससारख्या ठिकाणांवर मायक्रोसॉफ्ट एक्सप्रियन्स सेंटर्स सुरू ठेवेल.

कंपनीचे म्हणणे आहे की, रिटेल स्टोर्सवर मिळणार्‍या सर्व सुविधा युजर्ससाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध असतील. कंपनीने न्यूजलेटरमध्ये हे सुद्धा म्हटले आहे की, तुलनेत आमच्या ऑनलाइन विक्रीत लागोपाठ वाढ होत आहे आणि आमची टीम वर्च्युअल पद्धतीने कस्टमर्सला चांगली सर्व्हिस देत आहे.

मायक्रोसॉफ्टने आपले रिटेल स्टोर्स बंद करण्याच्या घोषणेसोबत हे सुद्धा म्हटले की, आम्ही एक अशी टीम तयार केली आहे ज्यामध्ये मल्टीटॅलेंटेड लोक आहेत आणि जगातील कोणत्याही कोपर्‍यातून काम करण्यास सक्षम आहेत. आमच्या टीममध्ये असे लोक आहेत जे 120 पेक्षा जास्त भाषा समजतात आणि ही टीम पहिल्यापेक्षा अधिक मजबूत आहे.