‘कारगिल’मधील ‘बहादूर’ पराक्रमी मिग-27 ‘रिटायर’, जोधपूरमध्ये 7 लढाऊ विमानांचं शेवटचं ‘उड्डाण’ ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रॉकेट आणि बॉम्बच्या साहाय्यानं दुश्मानांना नेस्तनाबूत करणाऱ्या लढाऊ विमान मिग-27नं वायुसेनेतून निवृत्ती घेतली आहे. 34 वर्ष हवाई दलाचा भाग राहिल्यानंतर मिग-27 अखेर निवृत्त झालं आहे. मिग-27 नं शेवटचं उड्डाण शुक्रवारी केलं. या निमित्तानं जोधपूर एअरबेसमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात या विमानाला पूर्ण सन्मान देत निरोप देण्यात आला. यात स्वाड्रन क्रमांकाच्या 29 मधील शेवटच्या 7 मिग-27 विमानांनी शेवटचं उड्डाण घेतलं. 31 मार्च 2020 रोजी विमानाचं अधिकृत नंबर प्लेटींग (सैन्यदलातून बाहेर करण्याची प्रक्रिया) होणार आहे. मिग 23, मिग 23 एमएफ आणि खालिस मिग-27 यापूर्वीच निवृत्त केले गेले आहेत.

सर्वात शेवटी निरोप घेणारे सध्याचे मिग-27 हे अपग्रेडेड श्रेणीतले आहेत. 2006 मध्ये हा ताफा हवाई दलात दाखल करण्यात आला होता. मिग-27चा उपयोग 2001-02 मधील ऑपरेशन पराक्रममध्येही झाला होता. 1971नंतर भारतीय हवाई दलातील ही मोठी जमवाजमव होती. हवाई दलानं ट्विट करत सांगितलं आहे की, मिग 27 1985 साली हवाई दलात समाविष्ट झाले होते.

कारगिल युद्धात मोठं योगदान दिल्यानं त्यांचं नाव बहादूर ठेवण्यात आलं होतं. जोधपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात एस के घोटीया विशिष्ट सेवा मेडल, एअरफोर्स ऑफसर कमांडिंग इन चीफ दक्षिण-पश्चिम एअर कमांड सहित हवाई दलातील अनेक आजी-माजी अधिकाऱ्यांनीउपस्थिती लावली होती.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/