Mika Singh | मिका सिंगने सोनू निगमसाठी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाला “मुंबई सर्वात सुरक्षित…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम : सोनू निगम सोबत चेंबूर येथे झालेल्या घटनेवर बॉलीवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग (Mika Singh) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मिका हा त्याच्या हटके गाण्यासोबतच खाजगी आयुष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असतो. तो समाजात घडणाऱ्या घटनांवर नेहमीच भाष्य करत असतो. त्याने गायक सोनू निगमसाठी शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Mika Singh)

मिका सिंगने त्याचा आणि सोनू चा एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये म्हटले की, “आदरणीय गायक सोनू निगम यांच्यावर मुंबईमध्ये झालेला हल्ला ऐकून खूपच वाईट वाटले. हा खूपच धक्कादायक प्रकार आहे. मी जेव्हा स्वतः उत्तर भारतात शो करतो तेव्हा माझ्यासोबत 10 सुरक्षारक्षक असतात आणि तेच जर मुंबईमध्ये माझे शो असतात तेव्हा एकही सुरक्षारक्षक माझ्यासोबत नसतो. कारण हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहर आणि सुरक्षित शहर आहे. सर्वच कलाकारांना मान द्यायला हवा असे मला वाटते. आम्ही लोकांमुळेच बनलो आहे आम्ही लोकांसाठी आहोत. सोनू निगम आम्ही तुमच्याबरोबर आहोत”. सध्या मिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

भारतातील पॉप गायक आणि रॅपर म्हणून मिका सिंगची (Mika Singh) ओळख आहे. आजवर त्याने पंजाबी इंडस्ट्रीत अनेक गाणी गायली आहेत. त्याच्या आवाजाने त्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पंजाबी इंडस्ट्रीत प्रसिद्ध गायकमध्ये त्याचे नाव आवर्जून घेतले जाते. मिका सिंगने ‘सिंग इज किंग’ आणि ‘जब वी मेट’ या अशा अनेक बॉलीवूड चित्रपटांमधली गाणी गायली आहेत.

चेंबूर मध्ये सोनू निगम सोबत नक्की काय घडलं ?

20 फेब्रुवारी रोजी चेंबूर मध्ये एक संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळेस सोनू निगम त्याच्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता.
कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्याला धक्काबुक्की केली.
यादरम्यान सोनू निगम आणि त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसात त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून या प्रकरणी त्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- Mika Singh | singer mika singh commented on sonu nigams attacked in chembur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Temperature | विदर्भात उन्हाळ्याची लागली चाहूल; जाणून घ्या बाकीच्या जिल्ह्यात काय आहे स्थिती ?

Pune Pimpri Chinchwad Crime News | अटक टाळण्यासाठी आरोपीचा पोलिसावर हल्ला करुन केला आत्महत्येचा प्रयत्न; देहुरोड मधील घटना

NCP Chief Sharad Pawar | ‘पहाटेच्या शपथविधीमुळे एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…’ शरद पवारांचं मोठं विधान (व्हिडिओ)