भारत दौऱ्यावर येण्यापूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणतात ‘मोदी है तो मुमकिन है’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला घवघवीत यश मिळालं. यंदा लोकसभा निवडणुकीवर फक्त भारतातीलच लोकांचे लक्ष नव्हते तर जगातील मोठ्या देशांचेही लक्ष होते. तसंच भारतासहीत जगभरात मोदींचे चाहते झाले आहेत, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मोदींच्या यशामध्ये त्यांच्या प्रचार आणि आयटीसेलचा मोठा आणि मोलाचा वाटा होता. यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकारने प्रचारादम्यान अनेक घोषणांचा वापर केला. मात्र त्यातील ‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा सर्वाधिक लोकप्रिय झाली. त्यामुळेच की काय पण भारतीयांसह इतर देशातील लोकांच्याही तोंडात ही घोषणा दिसत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनाही या घोषणेची भुरळ पडली म्हणायला हरकत नाही. पॉम्पेओ यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी चक्क ‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा दिली. वॉशिंग्टन येथे इंडिया आइडियाज समिट कार्यक्रमात ते बोलत होते.

मला भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या पातळीवर नेऊन ठेवायचे आहेत. मोदी आणि ट्रम्प प्रशासनासाठी ही एक अद्वितीय संधी आहे, असं पॉम्पेओ यांनी यावेळी म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य नव्या पातळीवर जाऊन पोहोचले आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैश्विक स्तरावर आपल्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करता येईल. त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे, अंस पॉम्पेओ यांनी म्हटले. तसंच येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, पॉम्पेओ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहे. या भेटीत दोन्ही देशांमधील सामरिक रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पॉम्पेओ भारतानंतर श्रीलंका, जपान, आणि दक्षिण कोरिया या देशांनाही भेट देणार आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन