साेशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल : ‘मेरे प्यारे भाइयों- बहनों और मित्रों… पाकिस्तान अब नहीं रहा’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर आता नेटीझन्सकडून अनेक विनोदी प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. ‘सारखा मोबाईल हातात घ्यावा लागत आहे कारण मोदी अशी घोषणा कधीही करू शकतात की, पाकिस्तान आता राहिलं नाही.’ असे मीम्स व्हायरल करत नेटकऱ्यांकडून पाकिस्तान आणि पाकचे पंतप्रधान इम्रान यांची खिल्ली उडवली जात आहे. व्हॉटसअप , फेसबुक, ट्विटर अशा अनेक माध्यमातून हे मीम्स व्हायरल होताना दिसत आहे.
काही व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 
‘5-5 मिनट पर मोबाईल चेक कर रहा हूं…
क्या पता कब बोल दें
मेरे प्यारे भाइयों- बहनों और मित्रों…
“पाकिस्तान अब नहीं रहा”
तर काही मेसेजमध्ये म्हटलं आहे,
BRAKING NEWS …
इमरान खान ने पाक सेना को दी खुली छूट,
कहा है कि जहां से जगह मिले भाग लेना…
तर काही मेसेजमध्ये म्हटलं आहे की,

पुन्हा एकदा पाकिस्तान काय घडलं नेमकं हे कळण्या अगोदरच रन आऊट झाला…

दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. बालाकोट, चकोटी, मुज्जफराबाद या तीन ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. भारताच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी या तीन ठिकाणी १ हजार किलो बॉम्बफेक करुन ही कारवाई केली आहे. पहाटे साडेतीन वाजता केलेल्या या हल्ल्यात भारताची सर्व विमाने आपले ठरलेले लक्ष्य साधून काही मिनिटातच परत सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परत आली आहेत. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद याचा कॅम्प उध्वस्त झाला आहे.
https://twitter.com/MajorPoonia/status/1100254963580719111?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1100254963580719111&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatoday.in%2Findia%2Fstory%2Fair-force-airstrikes-pakistan-terror-launchpads-twitter-reactions-1465166-2019-02-26
https://twitter.com/HappuDroga2/status/1100258660016504832
https://twitter.com/kishlay_thakur/status/1100259579902992384
https://twitter.com/ikpsgill1/status/1100252402844725255
https://twitter.com/imsubrath/status/1100262021138968576