मिरज : निवडणुकीत बनावट जातीचा दाखला देणाऱ्या सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

सरपंचपदाच्या निवडणुकीत हिंदू लिंगायत कुंभार असा बनावट जातीचा दाखला सादर करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी कदमवाडीचे सरपंच विनायक दत्तात्रय कुंभार (वय 45, रा कदमवाडी मिरज) यांच्याविरुद्ध मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aaa18b9c-b5e2-11e8-b452-ebf03e75ef02′]

या प्रकरणी मिरजेचे मंडल अधिकारी कबीर गणपती सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे. विनायक कुंभार यांच्याकडे कुंभार जातीचा दाखला आहे. मात्र त्यांनी त्यांचे भाऊ महादेव यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत कुंभार असा उल्लेख असलेला दाखला वापरून हिंदू लिंगायत कुंभार या जातीचा बनावट दाखल्याचा वापर केला. तो दाखला सरपंच निवडीवेळी सादर केला. या प्रकरणी चौकशीचे आदेश मिरजेचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी तहसीलदार यांना दिले होते.

याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून मंडल अधिकारी सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आली होती. आज सूर्यवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात कुंभार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच कुंभार यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी