Miss India USA 2021 | मिशिगनच्या वैदेही डोंगरेने जिंकला मिस इंडिया यूएसएचा किताब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Miss India USA 2021 | मिशिगनच्या 25 वर्षाच्या वैदेही डोंगरे (Vaidehi Dongre) ने मिस इंडिया यूएसए 2021 (Miss India USA 2021) चा किताब जिंकला आहे. वैदेहीने मिशिगन (michigan) मधून ग्रॅज्युएशन केले आहे. ती एका मोठ्या कंपनीत बिझनेस डेव्हलेपमेंटचे काम करते. या स्पर्धेत जॉर्जियाच्या अर्शी लालानीने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

वैदेहीने या स्पर्धेदरम्यान म्हटले की, मला माझ्या समाजावर एक सकारात्मक प्रभाव सोडायचा आहे आणि महिलांच्या साक्षरतेसह त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर काम करायचे आहे.

मिस टॅलेंटेडचा किताबही जिंकला
वैदेही खुप चांगले कथ्थक करते. यासाठीच तिला मिस टॅलेंटेड किताबाने गौरवण्यात आले. तर अर्शीने आपल्या परफॉर्मन्स आणि कॉन्फिडन्सने सर्वांना आश्चर्यचकित केले. ज्यामुळे ती पहिली रनरअप बनली. ती ब्रेन ट्यूमरने पीडित होती. दूसरी रनरअप नॉर्थ कॅरोलिनाची मीरा कसारीने हा किताब जिंकला.

61 स्पर्धकांनी घेतला भाग
या 3 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 30 राज्यांच्या 61 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या तीन स्पर्धा- मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए होत्या. या तिन्ही विजेत्यांना जागतिक स्पर्धेसाठी मुंबईला जाण्याचे तिकिट देण्यात आले.

सुमारे 40 वर्षापूर्वी न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध भारतीय अमेरिकन सरन आणि नीलम सरन यांनी मे वर्ल्डवाईड पेजेंट अंतर्गत याची सुरुवात केली होती.
मिस इंडिया यूएसए भारताच्या बाहेर सर्वात जास्त काळ चालणारी इंडियन पेजेंट आहे.

Web Title :- Miss India USA 2021 | vaidehi dongre from michigan crowned with miss india usa 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही