महापालिका आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या नगरसेविकांचे निलंबन करावे : नाना काटे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ‘त्या’ दोन नगरसेविकांचे निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी एक पत्रक काढत केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही म्हटले आहे.
नाना काटे यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभागात पाणी येत नाही म्हणून सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने कासारवाडी येथे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच घडला. मागे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागास टाळे ठोकले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला गेला होता. आता मात्र कोणत्याही गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी दबावाखाली व दहशतीखाली काम करत आहेत.

मागील दोन दिवसापूर्वी सत्ताधारी एका नगरसेविकेने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. या घटनेनंतर आयुक्त दोन दिवस आजारी होते, असे समजते. टक्केवारी मिळावी म्हणून थेट आपणांस शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा राष्ट्रवादी नगरसेवकांवर गुन्हा दाखल होतो. तेव्हा त्याच कारणासाठी भाजपच्या नगसेविकेवर सुध्दा गुन्हा दाखल व्हायला हव होता. परंतु त्यावेळी आपण भाजप पक्षाला सोयीस्कर अशी भूमिका घेतली आपल्या या दुजाभावच्या वागण्यामुळे आपणांस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व ऐकरी भाषेत उल्लेख केला गेला. आयुक्तांनी त्याच वेळेस जर गुन्हा दाखल करण्यास सांगितले असते तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. जेथे आयुक्तांवर हि वेळ आली आहे तर सर्वसामान्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे काय? या प्रकरणी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन ‘त्या’ संबंधित नगरसेविकांवर गुन्हा दाखल करावा. महापालिका आयुक्तांसोबत गैरवर्तणूक केल्याबाबत ‘त्या’ नगरसेवविकांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.