MLA Bachchu Kadu | ‘संजय राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर…’, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर (Shinde Government) टीका केली होती. दिवाळीचा आनंदाचा शिधा अद्याप मिळालेला नाही, शिधा हा फक्त खोक्यात आमदारांना मिळतो. तो गरिबांना मिळत नाही अशी टीका केली होती. राऊतांच्या टीकेला आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले. राऊतांच्या स्वप्नात रोज खोके येतात. त्यांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर कुठंतरी उपचार करण्याची गरज असल्याचा टोला बच्चू कडूंनी (MLA Bachchu Kadu) लगावला.

बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) विधिमंडळ परिसरात एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
बच्चू कडू पुढे म्हणाले, राज्य कोणाचंही असलं तर गरिबांचं आयुष्य कडूच आहे. आपल्या देशात उपाशी झोपणारा आणि तुपाशी खाणारा, असे दोन वर्ग आहेत. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी तुपाशी खाणाऱ्या लोकांची व्यवस्था केली. त्यामुळे गरिबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नाही. सत्तेच्या बाहेर आले की त्यांना उपाशी लोकांची आठवण येते आणि सत्तेत आल्यावर तुपाशी असलेल्या माणसांशी रोज भेटीगाठी होतात, त्यातला हा प्रकार आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

गुढीपाडव्याला आनंद शिधा वाटप करण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली होती.
परंतु अनेक ठिकाणी हा शिधा पोहोचला नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना
घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांनी दिल्लीत एका वृत्तवाहीनीशी बोलताना सरकारवर टीका केली होती.

Web Title :  MLA Bachchu Kadu | bacchu kadu reaction on sanjay raut statement on anandacha shidha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalyukt Shivar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियान 2.0 पुणे जिल्ह्यातील 187 गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – देवेंद्र फडणवीस

Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit | अव्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी आता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित