MLA Bhaskar Jadhav | आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात FIR, पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane), माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्याविरोधात उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे (Advocate Adv. Vijay Singh Thombre) यांच्यामार्फत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

 

काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्याविरोधात उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी योगेश अरुण शिंगटे Yogesh Arun Shingte (वय ३७, रा. निगडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात  फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिंगटे हे गुडलक हॉटेलमध्ये बुधवारी दुपारी बसले होते. यावेळी ते त्यांचे फेसबुक (Facebook) अकाऊंट पहात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांच्याविरुद्ध चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा आयोजित केला होता.

या मोर्चामध्ये आमदार भास्कर (MLA Bhaskar Jadhav) जाधव यांनी भाषण केले. त्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भोषत वक्तव्य केले. त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होण्यास चिथावणी दिली.

 

केंद्रीय मंत्री पद हे संविधानिक पद असून या पदाचा अपमान करुन
जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याने गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (Assistant Police Inspector Kamble) तपास करीत आहेत.

 

Web Title :- MLA Bhaskar Jadhav | FIR against MLA Bhaskar Jadhav in
Deccan Police Station. Application for pre-arrest bail in Pune court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा