Shivsena Party Chief Uddhav Thackeray | त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, शिंदे गटाच्या प्रवक्त्याची उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांनी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत करण्याची मागणी केली. दरम्यान, ठाकरेंच्या (Shivsena Party Chief Uddhav Thackeray)  दौर्‍यामुळे धास्तावलेल्या भाजपा (BJP), शिंदे गटाने जोरदार टीका सुरू केली आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant), कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), आ. संजय शिरसाट (Sanjay Shirsat), भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी ठाकरेंच्या दौर्‍यावर टीका केली आहे. आता शिंदे गटाचे आणखी एक प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनीही ठाकरेंच्या दौर्‍यावर टीका केली.

 

 

नरेश म्हस्के यांनी ट्विट केले आहे की, ते आले, त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्यातलं किती समजलं माहिती नाही, कारण त्यांचा हा दौरा तासभरच होता. शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंना (Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray) म्हणाले होते, त्यांना बटाटे जमिनीवर लागतात का जमिनीखाली हे माहिती नाही. त्यांना शेतीतील काय कळणार? असे उद्गार पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल काढले होते.

 

बांद्रावरून ते बांधावर कधी पोहोचले कळलंच नाही. याआधी कधी मातोश्री मधून, वर्षामधून बाहेर पडलेत का? मुख्यमंत्री असताना 25 हजार रुपये शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन देतो म्हणाले होते, पण याआधी कधी ते शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले का?’ असा प्रश्न नरेश म्हस्के यांनी विचारला आहे.

म्हस्के यांनी म्हटले की, ही शिल्लक सेना वाचवण्यासाठी आणि काम करणार्‍या
सरकारवर टीका करण्यासाठी संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी शिंदेंसोबत आहेत,
त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी हा दौरा काढण्यात आला.

 

 

 

Web Title :- Shivsena Party Chief Uddhav Thackeray | uddhav thackeray in marathwada
to see farmers loss due to rain shinde camp targets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा