MP Srikanth Shinde | मुख्यमंत्र्यांचे पूत्र श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘हीच विरोधकांची पोटदुखी…’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) राज्यात आल्यापासून कशाप्रकारे काम करत आहे, याची माहिती देत खासदार श्रीकांत शिंदे (MP Srikanth Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. श्रीकांत शिंदे (MP Srikanth Shinde) यांनी म्हटले की, गेल्या 3 महिन्यात सरकार लोकहिताचे, कष्टकर्‍यांचे निर्णय घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जीआर काढले गेले. अडीच वर्षात जी गाडी थांबली होती ती सुसाट नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाने केले आहे.

 

 

खासदार श्रीकांत शिंदे (MP Srikanth Shinde) यांनी म्हटले की, दिवसरात्र हे सरकार काम कसे करू शकते?, वर्षाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली कशी? हीच पोटदुखी विरोधकांना आहे. त्यामुळे केवळ टीका करण्याचे काम विरोधकांकडे उरले आहे. आज सर्वसामान्य माणूस वर्षापर्यंत पोहचत आहे. आम्ही आमच्या कामातून उत्तर देत आहोत. विरोधकांनी टीका करत राहावी आणि आम्ही काम करत राहू असे मुख्यमंत्री म्हणतात. म्हणूनच ही तरूणाई एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठाम उभी आहे. हे सरकार प्रत्येकाच्या मनात होते. विरोधकांनी जनतेचा प्रतिसाद पाहून तरी डोळे उघडावेत.

 

श्रीकांत शिंदे यांनी पुढे म्हटले की, शिवसेना-भाजपा सरकार (Shivsena-BJP Government) लोकांच्या मनात होते.
त्याला लोकांनी परवानगी दिली आहे.
महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली 2 वर्ष सण साजरे केले गेले नाहीत.
आजही तेच करायची इच्छा आहे का? आज सगळे उत्साहात बाहेर पडले आहेत.
निर्बंधमुक्त वातावरणात लोक उत्सव साजरे करत आहेत. विरोधकांना जे काही बोलायचे ते बोलून द्या.
लोक सरकारच्या मागे ठामपणे उभे आहेत. आम्ही काम करत राहू त्यांना बोलू द्या.

शिंदे म्हणाले, दिवाळीचा पहिला दिवस असल्याने तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहिली आहे.
राम मारुती रोड, तलावपाळी याठिकाणी मुख्यमंत्री भेटी देत आहेत. सगळे सण आपण साजरे करतोय.
निर्बंधमुक्त वातावरणात लोक सण साजरे करतात.
विरोधकांना टीका करायचे काम ठेवले आहे ते दुसरे काय करणार.

 

 

Web Title :- MP Srikanth Shinde | mp shrikant shinde targeted uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा